Sunday 16 August 2015

सेवा करत असताना नेहमी विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे

मित्रानो सेवा करत असताना आपणास अनेक प्रश्न पडतात त्याची अचूक उत्तरे आपणास माहित नसतात  त्यामुळे आपली ऐनवेळी धावपळ होते परंतु महाराष्ट्र शासनच्या सामान्य प्रशासन विभागने विभागातील सेवा विषयक बाबी कार्यासनाच्या विषयास अनुसरून सातत्याने विचारले जाणारे प्रश्न व त्याची उत्तरे  या सबंधी एक पुस्तिका प्रकाशित केली आहे .                 

                   सदर पुस्तिकेत शासन निर्णय /परिपत्रके /आदेश /नियम /विनिमय यांच्या आधारे प्रश्न उत्तर स्वरुपात खुलासे एकत्रित पणे उपलब्ध करून या पुस्तीकात दिली आहे .             

               तरी सर्वांनी या पुस्तिकाच्या माध्यामाधून आपल्या शंका निरसन करून घ्यावी.             

         सदर पुस्तिका आपल्या कडे  संग्रही ठेवण्याकरिता खालील लिंक वरून download करून घ्यावी .

            पुस्तिका  DOWNLOAD करा .      


          या संबधीचे शासन निर्णय पाहण्यासाठी DOWNLOAD करण्यासाठी  खाली क्लिक करा .

               
                                   सेवा विषयक बाबी विषयी  शासन निर्णय 

Saturday 11 April 2015

मनोगत

आदरणीय ,
             शिक्षक बंधु आणि भगिनीनो
                              सप्रेम नमस्कार 
                  शिक्षक मित्र हा ब्लॉग प्रसिद्ध करताना मला विशेष आनंद होत आहे . शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे काम करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा दृष्टीने एक ब्लॉग निर्मिती करणे हा एक छोटासा प्रयत्न आहे.
           शालेद्यानातून उमलणाऱ्यासुंदर कोमल फुलावर सुसंस्कार व्हावे या बाल मनाचा सर्वांगीण म्हणजे भावनिक बौद्धिक शारीरिक मानसिक व सामाजिक व्हावा . हा विकास घडवण्याचे कार्य ज्ञानमंदिरच यशस्वीरित्या करू शकतात . ज्ञानर्जनाच्या या कार्यात मार्ग दाखवणारे शिक्षक हेच खरे  मार्गदर्शक असतात बंधुहो आपली हि मार्गदर्शकाची भूमिका यशस्वीरित्या पार पडण्यासाठी हा शिक्षक मित्र हा ब्लॉगआपणास वेळोवेळी उपयोगी पडेल असा मला विश्वास आहे . 
           शिक्षक मित्र हा ब्लॉगनिर्मितीसाठी प्रेरणा देणारे माझे आक्का व आबा (आई बाबा ) माझी पत्नी माझ्या दोन चिमुकल्या अनुष्का व गौरी माझे गुरुवर्य श्री . साळुंखे सर श्री मधुचंद्र राउत श्री मोहन जगताप सर  तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करणारे केंद्र प्रमुख  श्री गुरोडे सर मा विस्तार अधिकारी वाघ साहेब गटशिक्षण अधिकारी  मा. पवार साहेब मा. जनाथे साहेब त्याच बरोबर ज्यांच्याकडून भरपूर शिकलो व शिकत आहे असे मा. अनंतभाई पाटील सर आणि महत्वपूर्ण योगदान देणारा माझा मित्र परिवार या सर्वांचा मी शतश: ऋणी आहे . 
             बंधुनो प्रत्येक माणूस हा परीपूर्ण नसतोच तरी पण तो अपुर्णत्वाकडून पुर्णत्वाकडून जाण्याची धडपड करत असतो . तसेच शिक्षक मित्र या ब्लॉग मध्ये काही बाबी अपूर्ण असतील तर मोठ्या मनाने व उदार अंतकरणाने समजून घ्याल व आपणास अढळणाऱ्या उणीवा व आपल्या मौल्यवान सूचना मला कळवून सहकार्याची साथ द्याल हिच अपेक्षा . 
              दीपज्योतीची तेजस्वी किरणे म्हणजे यश आनंद सौख्य मांगल्य पवित्र समृद्धी हे प्रतिकात्मक रूप आपल्या जीवनात साकार होऊन सदैव यशस्वी व्हा .  आपल्या या ज्ञानदानाच्या कार्यास लाख लाख शुभेच्छा........................