HOME

आदरणीय ,
             शिक्षक बंधु आणि भगिनीनो
                              सप्रेम नमस्कार 
                  शिक्षक मित्र हा ब्लॉग प्रसिद्ध करताना मला विशेष आनंद होत आहे . शिक्षक म्हणून ज्ञानदान काम करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा दृष्टीने एक ब्लॉग निर्मिती करणे हा एक छोटासा प्रयत्न आहे . शालेद्यानातून उमलणाऱ्यासुंदर कोमल फुलावर सुसंस्कार व्हावे य़ बाल मनाचा सर्वांगीण म्हणजे भावनिक बौद्धिक शारीरिक मानसिक व सामाजिक व्हावा . हा विकास घडवण्याचे कार्य ज्ञानमंदिरच यशस्वीरित्या करू शकतात . ज्ञानर्जनाच्या या कार्यात मार्ग दाखवणारे शिक्षक हेच खरे  मार्गदर्शक असतात बंधुहो आपली हि मार्गदर्शकाची भूमिका यशस्वीरित्या पार पडण्यासाठी हा शिक्षक मित्र हा ब्लॉगआपणास वेळोवेळी उपयोगी पडेल असा मला विश्वास आहे . 
           शिक्षक मित्र हा ब्लॉगनिर्मितीसाठी प्रेरणा देणारे माझे आक्का व आबा (आई बाबा ) माझी पत्नी माझ्या दोन चिमुकल्या अनुष्का व गौरी माझे गुरुवर्य श्री . साळुंखे सर श्री मधुचंद्र राउत श्री मोहन जगताप मा . मनोज धस  मा . माना सुरेश धस  तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करणारे केंद्र प्रमुख  श्री गुरोडे सर मा विस्तार अधिकारी वाघ साहेब गटशिक्षण अधिकारी मा. कनोज साहेब मा. पवार साहेब मा. जनाथे साहेब त्याच बरोबर ज्यांच्याकडून भरपूर शिकलो व शिकत आहे असे मा. अनंतभाई पाटील सर आणि महत्वपूर्ण योगदान देणारा माझा मित्र परिवार या सर्वांचा मी शतश: ऋणी आहे . 
             बंधुनो प्रत्येक माणूस हा परीपूर्ण नसतोच तरी पण तो अपुर्णत्वाकडून पुर्णत्वाकडून जाण्याची धडपड करत असतो . तसेच शिक्षक मित्र या ब्लॉग मध्ये काही बाबी अपूर्ण असतील तर मोठ्या मनाने व उदार अंतकरणाने समजून घ्याल व आपणास अढळणाऱ्या उणीवा व आपल्या मौल्यवान सूचना मला कळवून सहकार्याची साथ द्याल हिच अपेक्षा . 
              दीपज्योतीची तेजस्वी किरणे म्हणजे यश आनंद सौख्य मांगल्य पवित्र समृद्धी हे प्रतिकात्मक रूप आपल्या जीवनात साकार होऊन सदैव यशस्वी व्हा .  आपल्या या ज्ञानदानाच्या कार्यास लाख लाख शुभेच्छा........................